रत्नागिरीत मत्स्यपदार्थ स्पर्धेचे १६ ऑक्टोबरला आयोजन

रत्नागिरी : येथील भंडारी फाउंडेशनतर्फे येत्या १६ ऑक्टोबरला दुपारी २ ते संध्याकाळी ७ या वेळेत श्री भैरव मंगल कार्यालयात जागतिक अन्नदिवस सोहळा आयोजित केला आहे. त्यात प्रथम सत्रात मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धा, दुसऱ्या सत्रात व्याख्यानमाला आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल.

मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील भंडारी समाजातील स्त्री आणि पुरुष सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेअंतर्गत प्रत्येक स्पर्धक एकच पदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित करू शकतो. जो मत्स्यपदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे त्या पदार्थाच्या कृतीमध्ये मासे अथवा कवचधारी जलचराचा समावेश असणे बंधनकारक राहील. प्रथम विजेत्या स्पर्धकास ३ हजार रु., द्वितीय २ हजार रु., तृतीय १ हजार रु. आणि उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकाला ५०० रुपयांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाममात्र नोंदणी शुल्क आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रूपेंद्र शिवलकर, विनायक भाटकर, पराग भाटकर, सुहास धामणस्कर, सुरेश शेट्ये, गजानन मयेकर, दर्शन रांगणेकर, नेहली नागवेकर, नंदकुमार महाकाळ, अमोल आरेकर, विनया भाटकर, मंगेश शिरधनकर यांना संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 10/Oct/2024