पुणे एसटी बंद केल्यामुळे गैरसोय

साखरपा : रत्नागिरी-पुणे ही रातराणी अचानक बंद केल्यामुळे साखरपा परिसरातील प्रवाशांची पंचाईत झाली आहे.

ही एसटी कमी भारमानाचे कारण देऊन बंद करण्यात आली. रत्नागिरीहून रात्री ८.३० वा. पुणे-वल्लभनगर ही शिवशाही बस नियमित सुरू होती. वल्लभनगर येथे जाणारी ही एकमेव बस असल्यामुळे साखरपा पंचक्रोशीतील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची होती.

बसला सातत्याने प्रवासी मिळत असताना गेल्या काही दिवसांपासून ही बस बंद केली. हीच बस आता मार्ग बदलून चिपळूणमार्गे सुरू केली आहे. बसला साखरपा परिसरातून प्रतिसाद मिळत असताना ती का बंद केली, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत, तसेच ही बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही प्रवाशांकडून होत आहे. रत्नागिरी आगाराला शिवशाही बस देणे शक्य नसेल तर किमान साधी बस तरी मार्गावरून पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 10-10-2024