खेड : कुळवंडीत तंबाखू गुटख्याच्या धोक्याबाबत जनजागृती

खेड : तालुक्यातील कुळवंडी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ५.० अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तंबाखुसह गुटख्याच्या सेवनाने शरीराला पोहोचणारा धोका याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करत तंबाखू गुटख्याचे सेवन न करण्याचा सल्ला देण्यात आला.

सरपंच विष्णू निकम, उपसरपंच संचिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. ग्रामस्थांमध्ये व्यापक स्वरुपात जनजागृतीसाठी मोक्याच्या ठिकाणी फलक देखील लावण्यात आले आहेत. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यापूर्वी जनजागृती केली. गुटखा व तंबाखू सेवन न करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 09/May/2025