India-Pakistan War : भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखता आला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत हास्यास्पद उत्तर

India-Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारतीय सैन्यदलाने बदला घेतला होता. त्यानंतर पाकिस्ताननेहीभारताच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

मात्र पाकिस्तानने देशाच्या पश्चिम सीमेवर केलेले हल्ले उधळून लावत पाकिस्तानच्या विविध भागात जोरदार ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली असून, याबाबत पाकिस्तानच्या संसदेत उत्तर देताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अतिशय हास्यास्पद प्रतिक्रिया दिली आहे.

ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये सांगितले की, काल जो ड्रोन हल्ला झाला, तो खरंतर आमचं लोकेशन शोधण्यासाठी करण्यात आला होता. ही खूप तांत्रिक बाब आहे. त्यामुळे मी त्याबाबत अधिक स्पष्टिकरण देऊ शकत नाही. मात्र आमची लोकेशन लीक होऊ नये, तिला डिटेक्ट करता येऊ नये, यासाठी आम्ही त्यांना इंटरसेप्ट केलं नाही.

ख्वाजा आसिफ यांनी पुढे सांगितले की, जेव्हा हे ड्रोन एका सुरक्षित मर्यादेपर्यंत पोहोचले तेव्हा आम्ही ते पाडले. पाकिस्तानमधील तज्ज्ञ कमर चीमा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, सर्वजण विचारताहेत की हे ड्रोन इस्लामाबादपर्यंत कसे काय पोहोचले? आम्हीत्यांना इंटरसेफ्ट का केलं नाही, आम्ही त्यांना इंटरसेफ्ट केलं होतं. मात्र इंगेजमेंटनंतर आमचे वेपन सिस्टिमचे वॉर्निंग सिस्टिम ऑन झाले होते. याचा अर्थ ते डिटेक्ट झाले होते. त्यामुळे आम्हाला त्यांना पुन्हा शिफ्ट करावं लागलं. इस्लामाबादच्या दिशेने आलेले ड्रोन हे ईएमएस माऊंटेन आहेत. याचा उद्देश असा आहे की ते आमच्या ग्राऊंड बेस डिफेन्सचा शोध घेतात आणि नंतर आपल्या कमांड सेंटरमध्ये ट्रान्समिट करतात. त्यामुळे त्यांना आमचं लोकेशन समजलं, असा दावाही त्यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:56 09-05-2025