रत्नागिरी : मंडणगड चौक येथे दारुच्या नशेत मद्यधुंद असलेल्या तरुणाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार ८ मे रोजी दुपारी १ वा. सुमारास करण्यात आली. सुरज लालीमल रावत (२४) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पो. काँस्टेबल विनय पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी संशयित हा मंडणगड चौकात दारु नशेत मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 10/May/2025
