India vs Pakistan War : आधीच पाकिस्तानची (Pakistan) अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना पाकने भारताशी युद्ध करण्याचे नको ते धाडस केलं आहे. किंबहुना निव्वळ वल्गना करत छाती बडवणाऱ्या पाकिस्तानला भारताशी वाकड्यात जाणं पुन्हा एकदा चांगलेच माहागात पडले आहे.
कारण ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारताने पाकिस्तानला एका पाठोपाठ जबर दणका देत पुन्हा डिवचू पाहणाऱ्या पाकड्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. अशातच आता पाकिस्तानला आपल्या मित्र देशांकडे मदतीसाठी पदर पसरविण्याची वेळ आली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला दिलासा देत 1 अब्ज डॉलरर्सची मदत मंजूर केली असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं हा दावा केला आहे.
पाकिस्तानला दिलासा, 1 अब्ज डॉलर्सचे बेलआऊट पॅकेज मंजूर
पुढे आलेल्या माहितीनुसार आयएमएफकडून (IMF) पाकिस्तानसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या हप्त्याला मिळालेली मंजुरी ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारत असून देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानला मदत देण्यासंदर्भात विरोध करण्यात आला होता.
भारताचा कडाडून विरोध
दरम्यान, एकीकडे भारत पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरत असल्याचं चित्र आहे. अशातच भारताचा विरोध असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF ने पाकिस्तानला कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. IMFकडून पाकिस्तानला कर्ज मंजूर झालंय. मात्र पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करत असल्याची शक्यता भारताकडून करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कर्ज देण्यास भारतानेविरोध केला होता, तर IMFच्या मतदानासाठीही भारत अनुपस्थित राहिला होता. अशातच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला काही अंशी दिलासा दिला असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मानले आभार
पाकिस्तान पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार, “पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयएमएफने पाकिस्तानसाठी १ अब्ज डॉलर्सच्या हप्त्याला मंजुरी दिल्याबद्दल आणि भारताने त्याविरुद्ध मनमानी कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. निवेदनात म्हटले आहे की पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारली आहे आणि देश विकासाकडे वाटचाल करत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 10-05-2025
