India Pakistan War: पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं पाऊल, अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बोलावली बैठक

India Pakistan War : भारत-पाकिस्तान युद्ध संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची (NCA)महत्वाची बैठक बोलावली आहे. एनसीए (NCA) ही देशातील सर्वोच्च नागरी आणि लष्करी संस्था आहे, जी अण्वस्त्र कार्यक्रम आणि धोरणात्मक मालमत्तेबाबत कमांड, नियंत्रण आणि ऑपरेशनल निर्णयांसाठी जबाबदार असल्याचे मानलं जातं.

अशातच शाहबाज शरीफ यांनी बोलावलेली एनसीए (NCA) बैठक भारतासोबतच्या तणावाचे आणि ऑपरेशन सिंदूरला प्रतिसाद म्हणून धोरणात्मक पावले उचलण्याचे संकेत देत आहे.

नॅशनल कमांड अथॉरिटीची (NCA) स्थापना फेब्रुवारी २००० मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केली आणि त्याचे मुख्यालय इस्लामाबाद येथे आहे. पाकिस्तानच्या संरक्षण धोरणात आणि प्रादेशिक स्थिरतेत हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ९ मे २०२५ रोजी एनसीएची बैठक बोलावली आहे, जी भारतासोबत वाढत्या तणावाच्या संदर्भात महत्त्वाची आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने ७ मे रोजी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि ८ मे रोजी लाहोरमधील पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली.प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने फतेह १ क्षेपणास्त्र डागले, जे भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी नष्ट केले. या परिस्थितीत, पाकिस्तानच्या अणु आणि क्षेपणास्त्र रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्युत्तराची योजना आखण्यासाठी एनसीएची बैठक बोलावण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एनसीएच्या मुख्य जबाबदाऱ्या नेमक्या काय?

अणु आणि क्षेपणास्त्र धोरणाच्या मुद्द्यांवर निर्णय घेणे

धोरणात्मक आण्विक शक्ती आणि संघटनांसाठी धोरण निश्चित करणे

अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर देखरेख करणे

एनसीएचे अध्यक्ष आणि सदस्य कोण?

परराष्ट्र मंत्री: इशाक दार

गृहमंत्री: मोहसीन रझा नक्वी

अर्थमंत्री: मुहम्मद औरंगजेब

रक्षा मंत्रीः ख्वाजा मुहम्मद आसिफ

चीफ ऑफ जॉइंट कॉस्ट कमेटी: जनरल साहिर शमशाद मिर्जा

सेना प्रमुखः जनरल असिम मुनीर

नौसेना प्रमुखः एडमिरल नवेद अशरफ

वायु सेना प्रमुखः एअर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर

अशातच, शाहबाज शरीफ यांनी बोलावलेली एनसीए (NCA) बैठक भारतासोबतच्या तणावाचे आणि ऑपरेशन सिंदूरला प्रतिसाद म्हणून धोरणात्मक पावले उचलण्याचे संकेत देते. पाकिस्तानचे राष्ट्रीय कमांड प्राधिकरण हे देशाच्या अणु आणि क्षेपणास्त्र धोरणाचे सर्वोच्च नियंत्रक आहे, जे धोरणात्मक निर्णय आणि शस्त्रास्त्र सुरक्षेसाठी जबाबदार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 10-05-2025