खेड : येथील लोक संचलित साधना केंद्रातर्फे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भाताच्या रत्नागिरी ८ जातीचे बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक शेतकऱ्यांना भाताचे बियाणे मोफत दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी दीप्ती सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना भाताचे चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 12/May/2025
