रत्नागिरी : राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या बुधवार 14 मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 14 मे 2025 रोजी सकाळी 9.40 वाजता राजभवन हेलिपॅड येथून हॅलिकॉप्टरने प्रयाण. सकाळी 10.25 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, ता. दापोली येथील हेलिपॅडवर आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हेलिपॅड येथून मोटारीने डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे प्रयाण. सकाळी 10.35 वाजता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वाजता ते दुपारी 12 वाजता राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 43 व्या पदवीदान सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.05 वाजता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथून मोटारीने प्रयाण. दुपारी 12.10 वाजता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वाजता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हेलिपॅड येथून प्रयाण.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 13-05-2025














