भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची फेर निवड

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या नूतन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आहे. सावंत यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. रत्नागिरी उत्तरची जबाबदारी धडाडीचे भाजप पदाधिकारी सतीश मोरे यांना देण्यात आली आहे.

कार्यकर्ता जोडण्यात हातखंडा असणारे राजेश सावंत यांनी राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांमधून आपली राजकीय प्रवास केला आहे. शिवसेनेतून ते थेट भाजपमध्ये दाखल झाले. माजी संपर्कमंत्री व भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी तीनही विधानसभा मतदार संघात आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन चांगले काम केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही त्यांना पक्षाकडून मिळालेली जबाबदारी त्यांनी पार पाडली. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यकर्ता नोंदणीमध्येही आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत, चांगल्या प्रकारे नोंदणी केली होती.

त्यांना पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनीही पाठिंबा दर्शवला होता. नुकत्याच भाजपाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मतदान घेण्यात आले होते. यातही सावंत यांना पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 14/May/2025