रत्नागिरी : बेदरकारपणे ओमनी व्हॅन चालवून पादचाऱ्याला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना शुक्रवार २ मे रोजी सायंकाळी ७.४० वा. सुमारास पावस ते रत्नागिरी जाणाऱ्या राज्य महामार्गावरील मौजे गोळप शिरंबाडवाडी फाटा येथे घडली होती. अरविंद शिवराम गुरव (५०, रा. सापुचेतळे वाडिलिंबू वाघ्रट, लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ओमनी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात सुनिल सुरेश तोसकर (३६, रा. गोळप शिरंबाडवाडी, रत्नागिरी) हे जखमी झाले होते. शुक्रवार २ मे रोजी सुनिल तोसकर हे आपल्या ताब्यातील दुचाकी शिरंबाडवाडी फाटा येथे रस्त्याच्या बाजुला उभी करुन रस्ता ओलांडत होते.
त्यावेळी अरविंद गुरव हा आपल्या ताब्यातील ओमनी (एमएच-०६-एबी-८४६९) घेउन बेदरकारपणे रत्नागिरी ते पावस असा जात होता. तो शिरंबाडवाडी येथे आला असता त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रस्ता ओलांडणाऱ्या सुनिल तोसकर यांना धडक देत अपघात केला. या अपघातात तोसकर यांच्या डोक्याला, डाव्या हाताला तसेच डाव्या खांद्याला व कमरेला दुखापत झालेली होती. या अपघाताची नोंद सोमवार १२ मे रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 14/May/2025













