SSC Result 2025: कोकण मंडळ चौदाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम

रत्नागिरी : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकालामध्ये कोकण परिक्षा मंडळाने बारावीच्या निकालाप्रमाणेच सलग चौदाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेतही राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. यावर्षी कोकण मंडळाचा निकाल ९८.८२ टक्के लागला असून एकही कॉपी किंवा गैरप्रकार घडलेला नसल्याची माहिती कोकण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परिक्षेत कोकण मंडळात ९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. कोकण मंडळातून २६ हजार ८६१ विद्यार्थी परीक्षेस बसले व त्यापैकी २६ हजार ५४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.

कोकण मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.१५ टक्के तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.५२ टक्के आहे. पुनर्परीक्षार्थी १५० विद्यार्थ्यांपैकी ८८ उत्तीर्ण झाले. तसेच खासगी (बहिस्थ) विद्यार्थी ३१८ पैकी २८१ जण उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी मंडळाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन असे एकूण चार अनुभवी समुपदेशक परीक्षा कालावधीत नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा संचालनातील अडचणी दूर करण्यासाठी परीक्षा कालावधीत नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली होती, असे ही क्षीरसागर यांनी सांगितले.

ते म्हणाले, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक शाळांमध्ये २० ते २६ जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. कॉपीमुक्त अभियान यशस्वीतेसाठी परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी १५ भरारीपथके नियुक्त करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर प्रत्येक दिवशी शिक्षणा विभागाव्यतिरिक्त इतर शासकीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन बैठी पथके स्थापन करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रावर एकही गैरप्रकार झाला नाही.

जिल्हामाध्यमिक शाळाबसलेले विद्यार्थीउत्तीर्ण विद्यार्थीउत्तीर्णतेची टक्केवारी
रत्नागिरी४१९१८०१११७७५६९८.५८
सिंधुदुर्ग२३०८८५०८७९०९९.३२

विशेष गुण मिळालेले विद्यार्थी

क्रीडा प्रस्ताव १५१९

चित्रकला ७७८०

शास्त्रीय कला १९७,

लोककला २३०

स्काउड गाइड १

कोकण मंडळच भारी

वर्षटक्केवारीवर्षटक्केवारी
२०१२९३.९४२०१९८८.३८
२०१३९३.७९२०२०९८.७७
२०१४९५.५७२०२११००.००
२०१५९६.५४२०२२९७.२७
२०१६९६.५६२०२३९८.११
२०१७९६.१८२०२४९९.०१
२०१८९६.००२०२५९८.८२

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 14-05-2025