रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ नर्सिंग, रत्नागिरी मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
परिचारिका सप्ताहाला सुरुवात 6 मे पासून झाली.यामध्ये विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले होते. परिचारिका सप्ताह दरम्यान न्यूट्रिशन दिवसही साजरा करण्यात आला . यामध्ये विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारचे डायट बनवले व त्यांचे सादरीकरण केले. समतोल आहार,मधुमेहासाठीचा आहार, उच्च रक्तदाबासाठीचा आहार, कमी प्रथिनांचा आहार,असे वेगवेगळे आहार बनवले होते.
तसेच विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व, स्पर्धा पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केल्या होत्या. 9 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि आश्रम गीताने झाली . नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ समिना मुलानी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून निवृत्त नर्स व स्वगृही संस्था ( वृद्धाश्रम) याच्या संस्थापक श्रीमती विणा शिरीष लेले यांना आमंत्रित केले होते.त्यांनी विद्यार्थिनींना ‘अवर नर्सेस अवर फ्युचर,केअरिंग फॉर नर्सेस स्ट्रेंथन इकॉनॉमिक्स’ या यावर्षीच्या परिचारिका दिनाच्या थीम बद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रातील संधी व नर्सिंग क्षेत्रात होणारे बदल याबद्दल माहिती दिली. तसेच संस्थेच्या एल. एम. सी. मेंबर व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संपदा जोशी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना त्यांचे नर्सिंग क्षेत्रातील अनुभव सांगितले आणि मुली त्यांचे काम कसे कुशलतेने करू शकतात याबद्दल माहिती दिली. यावेळी बीसीए कॉलेज प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रश्मी यादव-जाधव यांनी केले व आभार सौ. गौरी भंडारी-भाटकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थिनींनी हॅन्ड वॉशिंग स्टेप्स यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 14-05-2025













