कोयना भूकंप पुनर्वसनास १५ लाखांचा निधी मंजूर

संगमेश्वर : करंबेळे मिरगलवाडी (ता. संगमेश्वर) येथील दौऱ्यावेळी आमदार शेखर निकम यांनी कोयना भूकंप पुनर्वसन योजनेंतर्गत १५ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. याबद्दल आमदार निकम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

या कार्यक्रमात आमदार निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावविकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या निधी मंजुरीमुळे स्थानिक पायाभूत सुविधांच्या उभारणीत मदत होणार आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. या वेळी रोहन बने, निधी पंदेरे, सचिन मांगले, मंगेश बांडागळे, आबा पंदेरे, भाऊ शेडगे, रामू पंदेरे, विनायक वाजे, मंगेश काबदुले, कृष्णा काबदुले, रमेश गवळी, तुकाराम मिरगळ, रघुनाथ मिरगळ, ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 14/May/2025