मंडणगड तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.३७ टक्के

◼️ तालुक्यात सिद्धी कासारे प्रथम

मंडणगड : मंडणगड तालुक्याचा निकाल ९७.३७ टक्के लागला. या परीक्षेसाठी तालुक्यातील २६ शाळांमधून ६४८ विद्यार्थी बसले होते. यातील ६३१ उत्तीर्ण झाले. गतवर्षीच्या तुलनेत तालुक्याच्या निकालात एक टक्का घट झाली आहे. तालुक्यातील तब्बल १७शाळांचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. या संदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या सिद्धी कासारेने ९७.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.

याच हायस्कूलच्या रूद्राक्ष निंगदाळेने (९४.८०) तालुक्यात द्वितीय आणि जान्हवी शेडगेने (९४.४०) तृतीय क्रमांक मिळवला.

तालुक्याचा उर्वरित निकाल अनुक्रमे असा शासकीय आश्रमशाळा वेरळ- नीतेश घरवे (७९.६० टक्के), साजन वाघमारे (७३.८०), लता झोरे (७३.४०). शाळेचा निकाल शंभर टक्के. योजक इंग्लिश स्कूल प्रणाली पारधी प्रथम (९३.४०), अय्यान वाडकर (८९.४०), वंश पांढरे (८८.६०). डॉ. आंबेडकर हायस्कूल – सिद्धी कासारे (९७.२०), रूद्राक्ष निंगदाळे (९४.८०), जान्हवी शेडगे ९४.४०. या शाळेचा निकाल ९८.४१ टक्के लागला. वेसवीतील के. व्ही. भाटे विद्यामंदिर सानिका किल्लेकर (९३.४०), रसिका साळवी (८५.००), हिंदवी सालदुरकर (८३.८०). शाळेचा निकाल १०० टक्के. आंबडवे येथील भारतरत्न डॉ. विद्यामंदिर- स्वरांगी काप (९०.४०), यश बिजन (८८.८०), मानसी जगताप (८५.६०). या शाळेचा निकाल ९३.३३ टक्के लागला. ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल मैथिली लोखंडे (८९.२०), अरमान चिखलकर (८८.३०), साधना सुतार (८७.००).

बाणकोट येथील जर्मन परकार हायस्कूल सलवा धनसे (८४), जमिला नाडकर (८१), इकरा शादुल्ला (७९). लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर सार्थ कासारे (८५.८०), भक्ती पारेख (७७.२०) व स्नेहल कासारे (७७.२०), मानवी जगताप (७६.२०). देव्हारे महाविद्यालय आर्या सापटे (८६.८०), सुदर्शन चोरगे (८५.६०), तन्वी बोथरे (८३.८०). हुतात्मा तुकाराम बबन भोईटे विद्यामंदिर सलोनी पारदुल (७३.२०), अंतरा लोखंडे (७१.४०), श्रावणी येसरे (६९). लालबहादुर शास्त्री हायस्कूल वंशिका कांबळे (९२), सानिया चव्हाण (९०.६०), ईश्वरी तांबुटकर (८४.८०). पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल अश्विनी नगरकर (८६.४०), वेदिका शिगवण (८०.६०), सायल शिगवण (७९.४०). राजीव गांधी स्कूल तन्यिका सिंग, प्रतीक्षा सैनी (९१.४०), अनोमा जाधव (९०.८०). छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली साईराज घाणेकर (९१.६०), मानस शिंदे (८८.४०), किरण बदे (८६.६०). तुळशी न्यू इंग्लिश स्कूल श्रेयस माळी (८५), आर्यन बोर्ले (८२.४०), साई शिगवण (८०.२०). शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कादवण प्रज्वल वसावे (७०.२०), अंजली वाघमारे (६३), रोहन वाघे (६०.२०).

निगडी न्यू इंग्लिश स्कूल- पूजा गायकवाड (७१.६०), सिद्धी पागडे (६५.२०), रिद्धी पागडे (६०.६०). उर्दू विद्यालय पंदेरी इफरा ठोकन (७६.४०), निदा माटवणकर (७४.६०), मीर तहविलदार (७३.२०). इनामदार पब्लिक स्कूल शिपोळे-मुनाफ धनसे (६५.४०), उबेद नाडकर (६३.६०), न्यू इंग्लिश स्कूल म्हाप्रळ कस्तुरी जाधव (८१.८०), सिद्धी घडवले (८०.४०), साक्षी बेर्डे (७९.६०). नॅशनल उर्दू हायस्कूल सादिया खान (८२.४०), उमेहिनी पावस्कर (८२.२०), आपताब खान (७७.००).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 14/May/2025