खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील खोपी फाटा येथे बुधवारी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि टँकर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहने पुलावरच एकमेकांमध्ये अडकून राहिल्याने महामार्गावरील वाहतूक तासापासून पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, खोपी फाटा येथील पुलावर ट्रक आणि टैंकर समोरासमोर आले व त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहनांच्या केबिन एकमेकांत अडकून गेल्याने ट्रकचालक अपघातग्रस्त वाहनात अडकून पडला होता. घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक व पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
या अपघातात ट्रक चालक व टँकर चालक दोघेही गंभीर जखमी झाले (नावे समजू शकली नाहीत) असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 15/May/2025













