खेड : नगर परिषद हद्दीतील खेड-दापोली राज्य रस्ता बांधणी आणि पाणी पुरवठा या विषयावर १३ रोजी गृहराज्य मंत्री नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत खेड पालिकेच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी त्यांनी रस्त्याची रुंदी वाढवण्याबाबत अधिकारी व नागरिकांसोबत चर्चा केली.
ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत खेड मधील भरणे नाका ते डेंटल कॉलेज आणि वाकवली ते दापोली परिसरातील मुख्य रस्त्याच्या बांधकामाचा सखोल आढावा ना. कदम यांनी घेतला.
रस्त्याच्या कामाला लवकर सुरुवात करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ते म्हणाले, हा रस्ता गावांना जोडणारा, दळणवळण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याने रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे, नागरिकांना सोई सुविधा दर्जेदार मिळाव्यात, असे निर्देश देखील यावेळी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत संबंधित विभागीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 15/May/2025














