मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग

रत्नागिरी : शहराजवळील मिऱ्या अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ एका जुन्या झाडाला आग लागल्यामुळे नागरिकांची धावपळ व घरबराट निर्माण झाली; मात्र पालिका व फिनोलेक्सच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ही घटना बुधवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास मिऱ्या अलावा येथे घडली. अलावा येथील एका नागरिकाने सकाळी सुकलेला पालापाचोळा झाडाच्या जवळ जमा केला होता. कचरा पालापाचोळा जाळत असताना आग जुन्या झाडाच्या सुक्या बुंध्याकडे गेला. त्यामुळे आत सुकलेल्या झाडाच्या पोकळ फांद्यांतून आग बाहेर पडली. ग्रामस्थांनी तत्काळ पालिका व फिनोलेक्स अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात दलाला यश आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 15/May/2025