मठ येथील ज्योतिष संमेलनाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : प्रचार, प्रसार, प्रबोधन, प्रयत्न आणि प्रमाण या पंचसूत्रींच्या आधारावर कार्यरत असणाऱ्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे सोळावे एकदिवसीय ज्योतिष संमेलन मठ (ता. लांजा) येथील गोरखनाथ मंगल कार्यालयात झाले. त्याला ९० पेक्षा जास्त ज्योतिष अभ्यासक व ज्योतिषप्रेमी उपस्थित होते.

या कार्यक्रमात आयादी ज्योतिष वास्तूच्या अध्यक्षा शुभांगिनी पांगारकर यांना पद्मश्री, पंढरपूर येथील ज्योतिषी राधेश बादले-पाटील यांना कार्यगौरव, विलास काणे यांना चैतन्य भूषण, नलिनी पवार आणि पल्लवी जोशी यांना चैतन्यसेवा तसेच कल्पना देशपांडे यांना ज्योतिषाचार्या डॉ. सविता कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट शिष्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या २०२४-२५ यावर्षी झालेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वैदिक पंडित, वास्तgशास्त्र विशारद, हस्तसामुद्रिक (प्राज्ञ, विशारद), मुखचर्याशास्त्र (प्रवीण, प्राज्ञ, विशारद) या अभ्यासक्रमात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदवीदान व कौतुक सोहळा झाला.

या वेळी कोल्हापूर येथील नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. अमित पवार, ज्योतिषी गुरूश्री प्रिया मालवणकर, संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास खिलारे, त्र्यंबकेश्वर येथील गुरgजी गिरीश लोहगावकर, पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक नारायण सुखटणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उत्तम कार्य करणाऱ्या ७ अभ्यासकांना विशेष लक्षवेधी तर २१ अभ्यासकांना लक्षवेधी उत्तेजनार्थ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या संमेलनाबरोबरच भूगर्भ जलशोध कार्यशाळा घेण्यात आली. विविध साधनांचा वापर करून जमिनीखालील पाण्याचा अचूक शोध कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी केले. कार्यशाळेला महाराष्ट्र, गोवा या राज्यांतील विविध भागातील एकूण २२ अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 15-05-2025