चिपळूण : खडपोली तळे वाडी येथील तरुण अनंत घाणेकर हा रात्री कामावरन येत असताना डुकराने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी. पुणे येथे हलविण्यात आले आहे.
हा अपघात दि. १३ मे रोजी रात्री घडला. खडपोली तळेवाडी येथील अनंत घाणेकर हा नेहमी प्रमाणे रात्री जे. के. फाईल कंपनीत दुचाकीने कामाला जात असताना वाटेत दुचाकीला डुकरांची धडक बसली.
यावेळी घाणेकर खाली कोसळल्याने त्याला खूप मार लागला. तो गंभीर जखमी झाल्याने प्रथम त्याला सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे हलविण्यात आले होते. परंतु त्याला अधिक उपचाराची गरज असल्याने पुणे येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 16/May/2025













