गुहागर : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर रस्त्याशेजारील शेतामध्ये उलटला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरवेली आगरवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यामुळे अनेक वाहने आपटण्याचे प्रकार होत आहेत. हा रस्ता खचलेला असल्याने अनेक छोटे अपघात येथे होत आहेत.
गुरुवारी (ता. १५) सकाळी सागर पवार हा डंपरमध्ये खडी भरून वरवेली बौद्धवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाच्या ठिकाणी जात होता. परंतु वरवेली आगरवाडी येथील फाट्याजवळ रस्त्यात असलेल्या खड्यामध्ये डंपर आपटल्याने डंपरचा पाटा तुटला व डंपर रस्त्यानजीक असलेल्या शेतामध्ये उलटला.
सार्वजनिक बांधकाम के विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देऊनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण करत असताना अनेकवेळा येथे नागरिकांनी या खचलेल्या रस्त्यासंदर्भात ठेकेदाराला माहिती दिली होती; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा रेलिंग किंवा संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 16/May/2025













