रत्नागिरी : वाटद येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-वाटद येथे गावठी दारुची विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ५४० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत शंकर रहाटे (वय ७९, रा. वाटद परटवणे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे.

ही घटना गुरुवारी (ता. १५) सायंकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 17/May/2025

Tata altroz