ट्रक-टेंपोच्या अपघातामुळे संगमेश्वरात वाहतूक कोंडी

संगमेश्वर : संगमेश्वर येथे पारेख पेट्रोलपंपासमोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि टेंपोच्या अपघातामुळे वाहतूककोंडी झाली होती. यामध्ये दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

हा अपघात बुधवारी (ता. २१) सकाळी घडला. या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. संगमेश्वर बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंपासमोर गोव्याच्या दिशेने जाणारा टेंपो आणि मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक यांचा अपघात झाला.

सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या कामामुळे गेले काही दिवस वाहतूककोंडीची समस्या ऐरणीवर आली आहे. उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात आलेला चाकरमानी परतीच्या मार्गावर निघाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 22/May/2025

Tata motars tiago