पूर्णगड पोलिस ठाण्यात सलोखा समिती स्थापन

पावस : रत्नागिरी पोलिस दलामार्फत पोलिस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या सामाजिक सलोखा समितीची स्थापना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली ३२ जणांची ही समिती आहे. सामाजिक सलोखा समितीमध्ये पोलिस ठाणे हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती, तसेच सर्व जातीधर्मातील धर्मगुरू, आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश असणार आहे.

या समितीमार्फत यापुढे सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये साजरे होणारे सर्व धार्मिक सण व उत्सव यांच्या अनुषंगाने वेळोवेळी बैठका घेण्यात येणार आहेत. कोणत्याही धार्मिक सण व उत्सवाबाबत काही समस्या असल्यास त्यांची लगेच पोलिस ठाणे स्तरावर पूर्तता करण्यात येणार आहे. या समितीमधील सर्व सदस्यांना संबंधित पोलिस ठाण्यांमधील पोलिस अधिकारी, बिट अंमलदार यांचे संपर्क क्रमांक देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 02/Jun/2025

Shiva optical