Supriya Sule on NCP Merger: “दादा गेल्यानंतर हा विषय आमच्यासाठी संपला,” दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्ट वक्तव्य

Supriya Sule on NCP Merger: "दादा गेल्यानंतर हा विषय आमच्यासाठी संपला," दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्ट वक्तव्य

विलिनीकरणावर चर्चा झाली होती आणि तारीखही ठरली होती हे सत्य, मात्र यापुढे या विषयावर बोलणार नाही; सत्तेत सहभागी होणार नसल्याचेही सुळे यांनी केले स्पष्ट

मुंबई: Supriya Sule on NCP Merger या विषयावर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे आणि स्पष्ट विधान केले आहे. १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाले असते, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, "माझा दादा (अजित पवार) गेल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम देण्यात आला असून, यापुढे मी या विषयावर बोलणार नाही," असे ठामपणे सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हाला या विलिनीकरणाच्या गोष्टींचा कंटाळा आला नसेल, पण मला आता या चर्चांचा कंटाळा आला आहे. दादा आणि आमच्या नेत्यांची तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची विलिनीकरणावर चर्चा झाली होती आणि तारीखही ठरली होती हे सत्य आहे. मात्र, माझा भाऊ दादा गेल्यानंतर या सर्व चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम दिला गेला आहे. अजित पवार गटाकडून काय चर्चा होतात, याच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही आणि आम्ही त्यांच्या प्रतिक्रियांवर काहीही बोलत नाही. माझे आणि माझ्या भावाचे नाते अत्यंत जवळचे होते आणि तो ओलावा कायम राहील, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

"महागाई आणि दुष्काळासारख्या प्रश्नांवर चर्चा व्हावी"
राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आमच्या नेत्यांशी चर्चा होते तर त्यात चुकीचे काय आहे? सध्या राज्यात महागाई, दुष्काळ, पॉलिसी मेकिंग अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी चर्चेसाठी आहेत. आज विलिनीकरणावर जे विचारायचे ते विचारा, मात्र यापुढे मी या विषयावर शांत बसेन, असे त्यांनी स्पष्ट केले. दादा गेल्यानंतर विलिनीकरणाचा विषय आमच्या मनातही राहिला नाही आणि तो विषय आमच्यासाठी तिथेच संपला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Arihant 2

सत्तेत सहभागी होणार नसल्याचा पुनरुच्चार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनाही सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला. आपण सत्तेत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, भारतीय लोकशाहीवर आमचा ठाम विश्वास असल्याचे महत्त्वपूर्ण विधानही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले. त्यांच्या या स्पष्टोक्तीनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय तर्कवितर्कांना मोठा ब्रेक लागला आहे.