खेडमध्ये घरगुती दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; 35 लिटर हातभट्टी दारू जप्त, एक अटकेत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवैध गावठी दारूविक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दि, 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भरणे, बाईतवाडी येथील एका घराच्या मागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोशि/1999 तुषार रमेश झेंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 182/2025 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय मधुकर जगदाळे (वय 51, रा. भरणे, बाईतवाडी) हा आपल्या राहत्या घराच्या मागील मोकळ्या जागेत गैरकायदेशीर आणि परवान्याशिवाय गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी त्याला जागेवरच ताब्यात घेतले. त्याच्याजवळून ₹3,600/- किमतीची 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे सत्र सुरू असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही तीव्र करण्यात येतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

tata motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 02-06-2025