कर्करोग मोबाईल व्हॅनचा चिपळुणात १७१ रुग्णांनी घेतला लाभ

चिपळूण : महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कामथे (चिपळूण) येथे २९ मे रोजी कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन (कर्करोग मोबाईल व्हॅन) माध्यमातून १७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या सुविधेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांनी केले. यावेळी कामथे गावच्या सरपंच हर्षदा कासार, कामथे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदींची उपस्थिती होती.

या व्हॅनच्या माध्यमातून १७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डेन्टल स्क्रीनिंग (ओरल) चे १०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामधून दोन रुग्णांची बायोप्सी तसेच सव्हर्डीकल कॅन्सर स्क्रिनिंगच्या २५ रुग्णांपैकी ३ रुग्णांची बायोप्सी, ब्रेस्ट एक्झामिनेशन स्क्रिनिंगच्या ४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या रुग्णांची तपासणी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. कांचन मदार यांनी सव्र्हीकल कॅन्सर स्क्रिनिंग तपासणी व आश्वासन तसेच बायोप्सी आणि ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि स्क्रिनिंग केले. डॉ. सतीश गवळे (दंत शल्यचिकित्सक), तसेच योगिता दंत महाविद्यालयातील ओरल सर्जन डॉ. के. सी. सिंग, वालावलकर रुग्णालय डेरवण येथील दंत शल्य चिकित्सक डॉ. आसावरी मोडक, डॉ. लिऑन डिसुझा यांनी भूलतज्ज्ञ म्हणून काम पाहिले.

तसेच जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथील डॉ. प्रसादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजयकुमार कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरसिंह यादव देशमुख, डॉ. मयुरी बेळकोणे, डॉ. भागवत, डेरवण हॉस्पिटलच्या डॉ. उत्कर्षा आणि डॉ. एपिता तसेंच इनचार्ज सिस्टर, अधिपरिचारिका, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 02/Jun/2025

Tata tiago