चिपळूण : तालुक्यातील राजेवाडी, डेरवण धरणाच्या दुरुस्तीच्या कामाचे नुकतेच आ. शेखर निकम यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. या कामासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या माध्यमातून १४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस आमदार शेखर निकम यांनी मंजुरी मिळविण्यात यश मिळवले आहे. आता या धरणाच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार शेखर निकम यांना धन्यवाद दिले आहेत.
राजेवाडी-डेरवण धरणाच्या गळतीमुळे गेल्या चार वर्षापासून सावर्डे, डेरवण आणि परिसरातील ४० गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
धरणातील पाण्याचा साठा अपुरा असल्याने पाण्याची टंचाई वाढत होती. ग्रामस्थांनी ही गंभीर बाब आमदार शेखर निकम यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आमदार निकम यांनी तत्काळ बैठका घेत समस्येचा आढावा घेतला व उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी या योजनेसाठी १४ कोटी ९९ लाखांच्या निधीस मंजुरी मिळवून घेण्यात यश मिळविले, नुकतेच या धरणाच्या दुरुस्तीच्या कामाचे नुकतेच आ. शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, यामुळे आता ४० गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी चिपळूण पंचायत समतीच्या माजी सभापती पूजा निकम, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, माजी पंचायत समित सदस्य प्रकाश कानसे, संजय निराधार योजना अध्यक्ष शौकत माखजनकर, रमेश राणे, नीलेश कदम, बंधू महाडिक, विष्णुपंथ सावर्डेकर, सावर्डे सरपंच समीक्षा बागवे, कुडप सरपंच बाबा राजेशिर्के, डेरवण सरपंच अक्षता मुंडेकर, मांडकी सरपंच अनंत खांबे, शीलभद्र जाधव, नरेंद्र राजेशिर्के, माजी सरपंच संतोष चव्हाण, प्रशांत राजेशिर्के, नीलेश यादव, देवेंद्र राजेशिर्के, बाळूशेठ मोहिरे, जमीर मुल्लाजी, संदेश चव्हाण, शेखर चव्हाण, तात्या गुरव, उदय बुदर, बाबू चव्हाण, संगीता चव्हाण, विभागातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 12/Oct/2024