बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलिसांचा रूट मार्च

जैतापूर – ईद-उल-अधा (बकरी ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने नाटे व परिसरात रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी व सण काळात शांतता अबाधित राहावी या उद्देशाने हा रूट मार्च घेण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. नाटे गावाच्या प्रमुख रस्त्यांपासून ते बाजारपेठ, धार्मिक स्थळे आणि वस्ती भागांपर्यंत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

या रूट मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून शांततेचे व सौहार्दाचे आवाहन केले. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची तयारी पूर्ण असून, कोणतीही गडबड न होण्यासाठी सर्व भागात कडक नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत सण शांततेत व सौहार्दात साजरा करण्याचे आश्वासन दिले. ईदचा सण सलोखा व शांततेत साजरा होण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

Tata safari

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 07/Jun/2025