लांजा उड्डाणपुलाच्या पिलवर चढवणार ३९२ गर्डर

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरात उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. पुलाच्या एका बाजूने गर्डर चढवण्याचे काम सुरू झाले आहे. या उड्डाणपुलावर ३९२ गर्डर बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या वतीने देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गाच्या लांजा ते वाकेड अशा १३ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील लांजा टप्प्यात शहरातील संत निरंकारी सत्संग भवन ते एसटी डेपोपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी ९७५ मोटर, तर रूंदी २५ मीटर इतकी आहे. या पुलासाठी एकूण ५० पिलर उभारण्यात आले असून, लांजा शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येवून या पुलाचे काम सुरू आहे. यामध्ये पूल उभारणीत २० मीटरचे गाळे ठेवण्यात आले असून, पिअरची उंची साडेपाच मीटर आहे.

शुक्रवारी उड्डाणपुलाच्या एका बाजूने गर्डर चढवण्याचे काम सुरू करण्यात आले. ३९२ गर्डर उभारण्यासाठी दोन टीम काम करत असून, प्रत्येकी १५० टन वजनाच्या दोन क्रेन, ५० फुटी दोन ट्रेलर कार्यरत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 09/Jun/2025