चिपळूण : नायशी येथे १२ जून रोजी ई-केवायसी शिबिर

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90

चिपळूण : शासनाकडून मिळणाऱ्या पीएम किसान योजनाचा २० वा हप्ता २० जूनला वितरित करण्यात येणार असून, ज्या शेतकऱ्यांचे आवश्यक ई-केवायसी आधार लिंक झाले नसेल त्यांना ही रक्कम मिळणार नाही. गावातील १०० शेतकरी आधार लिंक नसल्याने तालुका कृषी अधिकारी म्हेत्रे याच्या मार्गदर्शनाखाली १२ जून रोजी सकाळी १० वा हे शिबीर नायशी येथे आयोजित करण्यात आले असल्याचे सरपंच संदीप घाग यांनी कळवले आहे.

नायशी गावात नव्याने नियुक्त झालेल्या कृषी सहाय्यक आकाश चव्हाण यांनी शेतकऱ्यांची यादी दिली असून यादीत सहभागी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आवश्यक आधार लिंक करावे लागणार आहे. पी. एम किसान योजनेसाठी ई-केवायसी आधार लिंक करण्यासाठी कृषी विभागाची टीम नायशी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, अन्यथा चिपळूणमधील परकार कॉम्प्लेक्स येथील कृषी विभागाच्या कार्यालयात ईकेवायसी करावी लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 10/Jun/2025