रत्नागिरी : मिरजोळे-हनुमाननगर येथील तरुणाचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू

रत्नागिरी : झोपेतून उठल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अभिषेक संजय चव्हाण (वय ३०, रा. मिरजोळे-हनुमाननगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा सकाळी पावणेसात वाजता झोपेतून उठला. त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 10/Jun/2025