गुहागर : शिवणे येथे विद्युत तारेच्या धक्क्याने बैल दगावला

गुहागर : तालुक्यातील शिवणे येथील भागोजी गोविंद जोशी यांच्या मालकीचा बैल सोमवारी सकाळी ११ वाजता लगतच्या जंगलात चरावयास सोडण्यात आला होता. यावेळी जंगलात खाली पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने भागोजी गोविंद जोशी यांचे सुमारे २० हजारांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या हंगामात बैल दगावल्यामुळे जोशी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 11/Jun/2025

cake of the day