चिपळूण : आध्यात्मिक गुरुकुलचे उद्या लोटेत उद्घाटन

चिपळूण : श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान यांच्या वतीने लोटे परशुराम येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे उद्घाटन १२ जूनला होणार आहे. पुरुषोत्तम महाराज मोरे व माणिक महाराज मोरे तसेच प्रसिद्ध उद्योजक कैलासशेठ नंदा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या संस्थेच्या माध्यमातून अनाथ, निराधार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कोकरे महाराज यांनी पत्रकारांना दिली.

संस्थेतर्फे लोटे येथे गोशाळा चालवली जाते. या संस्थेच्या माध्यमातून आध्यात्मिक वारकरी गुरुकुल सुरू केले जात आहे. या निमित्त १२ ला सकाळी ८ वाजता गणेशपूजन व श्री सत्यनारायण पूजा
होईल. सकाळी १० वाजता दादा महाराज मोरे (कोल्हापूर) यांचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता उ‌द्घाटन होणार आहे. दुपारी महाप्रसाद, ४ वाजता वारकरी भजन, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ होईल. या वेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख जालिंदर काळोखे पाटील, विजय जगताप, रूपेश राजेशिर्के, भागवत महाराज भारती, ज्ञानेश शिगवण, प्रकाश सोलकर, विष्णू सोलकर, किशोर चौगुले, ज्ञानेश्वर रामाणे, राजेंद्र राजेशिर्के, गणपत येसरे, पांडुरंग रेवाळे, शिवाजी पालांडे, दत्ताराम आंब्रे, शशिकांत महाडीक, मोघरे गुरूजी आदी वारकरी सम्प्रदायातील महाराज उपस्थित राहणार आहेत.

आध्यात्मिक वारकरी गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षण, निवासव्यवस्था, जेवण, अन्य सुविधा मोफत उपलब्ध केल्या जाणार आहेत.

या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेऊन शालेय शिक्षणासह हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, तबला, शास्त्रीय गायन, वारकरी चाली, रामकथा, भगवद्गीता, संतचरित्र, शिवशंभू व शिवचरित्र, शिवकालीन युद्धकला, हार्मोनियम, पखवाजवादन शिकवले जाणार आहे. त्यामुळे गरजू, अनाथ मुलांनी येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन भगवान कोकरे महाराज यांनी केले. अध्यक्ष संजय पाथरे यांनी उपस्थित केला आहे.

tata motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 11/Jun/2025