सिंधुरत्न समृद्धी योजनेतून दुधाळ गाईम्हशी, शेळी गट अनुदान वाटप

रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील लाभार्थ्यांना दुधाळ गाई-म्हशी व शेळी गट अनुदानाचे धनादेश वाटप सावर्डे येथे झाले.

आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लाभार्थ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने पशुधन पुरवठा करण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि चिपळूण पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला. शेतीला आधार देणाऱ्या पशुधनाची योग्य निगा घेतल्यास ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

लाभार्थ्यांमध्ये सुधीर सावर्डेकर (असुर्डे), शरयु सावर्डेकर (रामपूर), चैतन्य मयेकर (कुटरे), संदीप राजेशिर्के (कुटरे), बाबाराम जाधव (दळवटणे), आणि शाबीरा पटाईत (कान्हे) यांचा समावेश असून त्यांना धनादेश वाटप करण्यात आले.

Ratnagiri Khabardar add image

कार्यक्रमास पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ. सोनावळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. काणसे, चिपळूणचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, डॉ. बाळाजी डोंगरे, शौकत माखजनकर, विजय भुवड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 30-06-2025