मंडणगड : पालवणी येथील शाळेच्या भिंतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

मंडणगड : तालुक्यातील पालवणी गोसावीवाडी येथील शाळेची संरक्षक भिंत २४ नोव्हेंबर २०२४ ला मुसळधार पावासामुळे कोसळली. ती अद्यापही दुरुस्त करण्यात आली नसल्याने शाळा व उर्वरित संरक्षक भिंतीसही धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शाळा व ग्रामस्थांच्यावतीने ने गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी व सरपंच यांना भिंती वे दुरुस्तीकरिता मागणीचे निवेदन ३० ने नोव्हेंबर २०२४ रोजी देण्यात आले होते.

त्यातील माहीतीनुसार शाळेच्या पश्चिमेकडील रस्त्यालगतची १४ मीटर इतक्या लांबीची भिंत पावसात कोसळली. तसेच त्याच बाजूची आणखी १४ मीटर इतक्या लांबीची भिंत कोसळण्याचे परिस्थितीत आहे. या भिंतीचे दगड शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर कोसळल्याने इमारतीसही धोका निर्माण झालेला असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 02/Jul/2025