कोळंबे ग्रामपंचायतीत कृषिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

पावस : जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोळंबे ग्रामपंचायतीत कृषिदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेली कृषी दिंडी, शाळा परिसरात वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांच्या शेतात चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या उपस्थितीत कृषी दिंडीने व वृक्षारोपणाने झाली. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, कृषी विकास अधिकारी अभिजित गडदे, प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतिवार, गटविकास अधिकारी चेतन शेळके, जिल्हा कृषी अधिकारी विकास मुळीक, कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण माळशे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, सरपंच प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

दापोली कृषी महाविद्यालयातील आरएडब्ल्यूई कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी कोळंबे येथे कृषी माहिती केंद्र स्थापन करून बीज प्रक्रियेवर प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञान अनुभवता आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तीन शेतकऱ्यांना बायोगॅस युनिट, गोठा बांधकाम व फळबाग लागवडीसाठी कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 03/Jul/2025

Amey jwelrs