कोळंबेत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन

पावस : दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकणा कृषि विद्यापीठ अधिनस्त कृषि महाविद्यालयातर्फे कोळंबे गावात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली. याचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले व कोळंबेचे सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते झाले.

या माहिती केंद्राची स्थापना चतुर्थ वर्ष विद्यार्थ्यांच्या मृदासूत गटातर्फे ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. यावेळी आत्मा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विजय बेटिवर, जिल्हा परिषद जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) विजय मुळे, मंडळ कृषि अधिकारी (पावस) सागर मिसाळ, कृषि विकास अधिकारी (जिल्हा परिषद) गडदे, कोळंबे उपसरपंच रवींद्र भताडे, सहाय्यक कृषि अधिकारी दीपक काळे उपस्थित होते.

या माहिती केंद्रामध्ये कोकण विभागातील पिकांच्या सुधारित वाण, सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जैविक खते, जैव नियंत्रक, हवामान अंदाज, विद्यापीठाचे प्रकाशन व विविध कृषी योजनांची माहिती उपलब्ध आहे. या उपक्रमास दापोली कृषि महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्येचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे, विषय विशेषज्ञ डॉ. रणजित महाडिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 03/Jul/2025

Shanti real estate 1