जमेल तसे प्रत्येकाने लिहीत राहा : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

रत्नागिरी : माणसाला मृत्यू असतो. अक्षरांना आयुष्य असते. त्यामुळे जमेल तसे प्रत्येकाने लिहीत राहा, लिहिते व्हा आणि अक्षर रूपाने जिवंत राहा. जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन या दंद्वात न पडता “माझ्यासाठी कला” हे सध्याच्या धकाधकीत फार महत्त्वाचे आहे. ते स्वीकारले पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.

राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात वस्तू व सेवा कर दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी दर्पण फाउंडेशनला अनाथ मुलांसाठी स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शनपर पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री. सातपुते म्हणाले, राज्य शासनाचा वस्तू व सेवा कर हा विभाग राज्याच्या विकासामध्ये कर रूपातून मोठा हातभार लावत असतो. त्यांच्या या कार्यातूनच विविध क्षेत्रांच्या विकासाला निधी उपलब्ध होतो.

मधमाशी ज्याप्रमाणे फुलाला न दुखवता मध गोळा करत असते. या विभागाचे कर गोळा करताना वर्णन केले जाते; परंतु कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कारवाईच्या रूपाने हा विभाग डंकही मारत असतो. प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला काळाच्या ओघात मारायचे की तारायचे हे प्रत्येकांनी ठरविले पाहिजे. सध्या धकाधकीच्या जीवनात एखादी कला जोपासली पाहिजे. त्या कलेच्या माध्यमातून कलाकार हा खरा जिवंत राहतो, असे असे सांगितले. याप्रसंगी उपायुक्त संदीप माने यांनी कर संकलनाबाबत सविस्तर माहिती दिली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 03/Jul/2025

Shanti2