रत्नागिरी : भाट्ये नारळ संशोधन केंद्रात केरा केरळम नारळ रोपांची लागवड

रत्नागिरी : शहरातील भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर नव्याने शिफारस करण्यात आलेल्या केरा केरळम या जातीच्या नारळ रोपांची लागवड करण्यात आली. कृषी दिनाचे औचित्य साधून ही लागवड करण्यात आली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि कृषी दिनानिमित्त केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अन्नधान्य, फळे भाजीपाला यांच्या उत्पादनामध्ये भारत देश स्वयंपूर्ण झाला आहे. त्या काळात हरितक्रांती झाली आणि भारतामध्ये शेतीमध्ये अमुलाग्र बदल झाले. भारतामधून मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादनाची निर्यातही होत आहे, अशी माहिती डॉ. मालशे यांनी दिली.

कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी निसर्ग संवर्धन आणि शेती याबाबत माहिती दिली. कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 04/Jul/2025

Ratnagiri Khabardar add image