रत्नागिरी : लांजा येथील फर्निचर दुकानामध्ये सुतार काम करत असताना कामगाराच्या हाताला लोखंडी कटर मशिन लागून तो गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, ४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास घडली. नंदकुमार रविंद्र पांचाळ असे जखमी कामगाराचे नाव आहे.
शुक्रवारी सायंकाळी तो लांजा येथील चौधरी फर्निचरमध्ये सुतार काम करत होता. त्यावेळी तेथील लोखंडी कटर मशिनचे पाते त्यांच्या डाव्या हाताच्या पंज्याला लागून गंभीर दुखापत झाली. या नंतर प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात नेउन नंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या नंतर त्याला कोल्हापूरला हलवले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 07/Jul/2025














