सीए डे निमित्त सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे २५ झाडांचे रोपण

रत्नागिरी : सीए डे निमित्त सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे शहरात विविध ठिकाणी देशी २५ झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच सीए व कुटुंबियांचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमही साजरा करण्यात आला.

शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम झाले. सीए डे निमित्त रत्नागिरी शाखेतर्फ विविध उपक्रम घेण्यात आले. सकाळी झेंडा वंदनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर वृक्षारोपण हा मुख्य कार्यक्रम दापोली आणि रत्नागिरी येथे सर्व सीएंनी एकत्र येऊन केला. दापोली आणि चिपळूण येथील सीएंनी त्यांच्या ठिकाणी काम करणाऱ्या संस्थांना समाजाप्रती सामाजिक बांधिलकी ठेऊन आर्थिक मदत केली.

शहरातील उद्यानांमध्ये २५ झाडे लावण्यात आली. या वेळी सीए बिपीन शहा, उपाध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सचिव सीए अक्षय जोशी, खजिनदार सीए नचिकेत जोशी, विकासा अध्यक्ष सीए अनुप शहा, सदस्य सीए शरद वझे, सीए आयेशा आघाडी, सीए सचिन तेंडुलकर आदी प्रमुख उपस्थित होते. दापोलीमधील सीएंनी विशेष उपक्रम केला. सर्व सीएंनी शेतामध्ये जाऊन भात लावणी केली. जे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत, ते सर्वजण आपापल्या वास्तव्याच्या अथवा कार्यालयाच्या जागी वृक्षारोपण करणार आहेत. सीए डे निमित्त सिद्धिविनायक मंगल कार्यालयात सायंकाळी सीए व कुटुंबियांचे स्नेहसंमेलन रंगले. त्यामध्ये शाखेचे माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, करसल्लागार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सीए मंदार गाडगीळ, सीए अभिजित पटवर्धन, सीए बिपीन शहा, सीए आनंद पंडित आदी अनेकजण उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 07-07-2025

Gadre2