रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सवाच्या शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ

रत्नागिरी : रत्नागिरीतील टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे २०२४-२५ हे वर्ष १०० वे अर्थात शतक महोत्सवी वर्ष असणार आहे. त्याचा शुभारंभ सोहळा रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी शतक महोत्सवाच्या लोगोचे अनावरण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन जोशी, महेश्वर जोशी, राजाभाऊ टोळ्ये यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी शिक्षिका सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी अथर्वशीर्ष या विषयावर सरळ व सोप्या भाषेत विवेचन केले. सायंकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ केळ्ये यांचे भजन झाले. या शुभारंभ सोहळ्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 16-10-2024

Naadi pariksha