मालगुंड प्रशालेत कासव संवर्धन जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड येथे जलजीविका संस्था व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कासव संवर्धन आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन १९ जुलै रोजी करण्यात आले होते.

कासव या प्रजातीविषयी विस्तृत अशी माहिती देताना कांदळवन प्रतिष्ठानचे सहायक संशोधक मोहन दत्तात्रय उपाध्ये यांनी कासवाच्या प्रजाती व त्यांचा जीवनक्रम यावर प्रकाश टाकला. कासव या प्रजातीच्या संवर्धनासाठी समुद्र किनारपट्टी लगत राहणाऱ्या लोकांनी किनाऱ्यावर आलेल्या जखमी कासवे आढळली तर त्याची माहिती कांदळवन विभागाला देण्याचे आवाहन केले

कासव या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांना पुढे यायला पाहिजे नाहीतर काही काळानंतर ही प्रजाती नष्ट होईल अशी भीती कांदळवनचे सहायक संशोधक मोहन दत्तात्रय उपाध्ये यांनी व्यक्त केली आहे. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्यात पुढे येऊन कासव या प्रजातीच्या संवर्धनासाठी काम करायला पाहिजे असे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाला जलजीविका संस्थेचे प्रोजेक्ट अधिकारी चिन्मय दामले, राज पवार, समृद्धी सनगरे, वेदिका चव्हाण, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 21/Jul/2025