लांजा : माचाळ येथे पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे पोलिसांनी माचाळकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची कसून तपासणी करून १९ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली.
माचाळला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामपंचायतीने जागोजागी सूचना फलक लावले आहेत. तरीही मद्यधुंद पर्यटकांचा धुडगूस थांबत नाही. या रोजच्या मनस्तापामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांविरोधातील तक्रारींमुळे रविवारी पोलिसांच्या पथकाने माचाळ येथे जाणाऱ्या पर्यटकांची माचाळला जाण्यापूर्वी गस्त घालत कसून तपासणी केली. दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनांची तपासणी करत मद्य नेण्यापासून रोखण्यात आले. त्याचप्रमाणे बेशिस्त पर्यकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 22/Jul/2025














