रत्नागिरी : सोमेश्वर शांतिपीठाच्या वतीने सोमेश्वर येथील विश्वमंगल गोशाळा येथे गोपूजन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता. २२) दुपारी ४ वाजता केले आहे. शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त याचे आयोजन केले आहे.
विश्वमंगल गोशाळेची स्थापना दोन वर्षांपूर्वी अक्षय्यतृतीयेला करण्यात आली. टप्प्याटप्प्याने रत्नागिरी शहर परिसरातील गायींचे संगोपन करण्याचे काम सुरू केले. सध्या येथे ७० गायींचे संगोपनाचे काम सुरू आहे. रत्नागिरी शहरातील भटक्या व बेवारस गायींच्या संगोपनाचे येथे काम केले जाते. गोशाळेच्या परिसरामध्ये विविध औषधी लागवडीचे कामही सुरू आहे. गायींचे संगोपन करण्यासाठी पूर्ण वेळ दोन कार्यकर्ते येथे आहेत.
यापूर्वी गोशाळेला समर्थरत्न पुरस्कार देऊन गौरवले आहे. रत्नागिरीतील गोभक्त अतिशय प्रेमाने या गोशाळेला भेट देतात. देणगी स्वरूप योगदान या गोशाळेला ते देत असतात. गोपूजनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गोभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोमेश्वर शांतिपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 22/Jul/2025














