गुहागर : चिखली मांडवकरवाडी शाळेसमोर रानगव्याचा मुक्त वावर

गुहागर : तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी जि. प. शाळा नंबर. २ या शाळेच्या समोर भर दुपारी २ च्या सुमारास भल्या मोठ्या रानगव्याचे दर्शन घडले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या गव्याला पाहण्यासाठी गर्दी केली तर काहींनी त्याचे फोटो काढले. दरम्यान, गव्याचा वावर होत असल्याने अनेकांनी भीती व्यक्त केली आहे.

वाढत्या जंगलतोडीमुळे हे रानगवे वाडीवस्तीमध्ये येऊ लागले आहेत. या रानगव्यासोबत आणखीही ४ ते ५ रानगव्यांचे समूह असल्याचे येथील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. जंगलतोड करणाऱ्यांना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे रानतोडीचे प्रकार वाढले आहेत. या रानगव्यांमुळे एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 22/Jul/2025