देवरुख : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांची संख्या पूर्वीचीच कायम ठेवण्यात आली आहे. मात्र दोन गट व एका गणांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. हीच संख्या कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये कोणताही गट व गण कमी व जास्त झालेला नाही.
तालुक्यातील नावडी जिल्हा परिषद गटाचे नाव मुचरी असे करण्यात आले आहे. तर पूर्वीचा असलेला ओझरेखुर्द जिल्हा परिषद गटाचे नाव साडवली असे करण्यात आले आहे. हा बदल ज्या विभागामध्ये जास्त लोकसंख्या व मतदारांची संख्या असते त्याप्रमाणेच त्या विभागाचे नाव त्या गट व गणाला दिले जाते. यानुसार तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. याचप्रमाणे कनकाडी पंचायत समिती गणाचे नाव हातीव करण्यात आले आहे. हाच बदल याचबरोबर काही गावांची गणांमध्ये निश्चिती करण्यात आली आहे. हा गावांचा झालेला गट वा गणातील बदल तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 22/Jul/2025














