गुहागर शहरातील तळ्यांच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव

गुहागर : गुहागर शहराला लाभलेल्या ५ कि. मी. च्या समुद्रचौपाटीबरोबर पुरातन मंदिरासमोरील तळी प्राचीन मंदिरे शहराची शोभा वाढवत आहेत. यामुळे शहराच्या पर्यटनाला पोषक अशा शहरातील ५ तळ्यांच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव गुहागर नगर पंचायतीच्या वतीने शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पुरातन तळ्यांच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी शहरातील पाच तळ्यांच्या सुशोभीकरणासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रस्तावाबाबत आपल्या तक्रार निवारण ग्रुपमध्येही माहिती देत याबाबत कोणाला मत व्यक्त करायचे असल्यास करू शकता असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रस्तावात शहराचा इतिहासही नमूद करण्यात आला आहे. येथील पर्यटनाला बाढता प्रतिसाद व स्थानिकांनी जोपासलेल्या प्राचीन मंदिरांचाही उल्लेख केला आहे. यामुळे अशा मंदिराशेजारील तळी जर सुशोभित केली तर पर्यटनासाठी जमेची बाजू ठरेल, असल्याचे स्पष्ठ केले आहे.

प्रस्तावित केलेल्या तळ्यांमध्ये गुहागर प्रस्तावितपैकी सोमेश्वर व समावेश असलेले सोमेश्वर मंदिराचे तळे कंमळांनी अच्छादले आहे. तळ्यापासून काही अंतरावर असलेली विहीर येथील जनतेला लक्ष्मी नारायण मंदिर तळे. पाण्याची व्यवस्था करून देत होती. हे तळे जर स्वच्छ करून त्याची दुरुस्ती केली तर तळ्याशेजारील परिसर व मंदिर याचे विलोभनीय पर्यटकांना भुरळ घालू शकते. यामुळे तळ्याशेजारी बसण्यासाठी बाके, बगीचा आदी सुविधाही ठेवण्यात येणार आहे.

दुसरे तळे गुहागर मच्छी मार्केटशेजारील आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या तळ्याचा पूर्वी पोहण्यासाठी वापर केला जात होता. अंतर्गत दोन भागांमध्ये व्यापलेल्या वा तळ्याची स्वच्छता केली तर ते वापरण्यायोग्य होणार आहे. वरचापाट श्री दत्तमंदिर येथील तळेही पुरातन आहे.

तळ्याची पुरातन मांडणी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शहराच्या मध्यभागी असलेले श्री व्याडेश्वर मंदिराचे तळेही सुशोभिकरणामध्ये घेण्यात आले आहे. या तळ्यांवर कारंजे बसवले तर शहरासाठी आकर्षणाचा भाग ठरणार आहे. खालचापाट येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर तळे पोहण्यासाठी अतिशय उत्तम तळे आहे. यामुळे या तळ्याचे सुशोभिकरण झाले तर पर्यटनासाठी जमेची बाजू ठरणार आहे. यामुळे हे तळेही नगरपंचायतीने सुशोभीकरणामध्ये घेतले असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 22/Jul/2025