मंडणगडात ४८ हजारांची खैराची ३५ झाडे चोरीस

मंडणगड : अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ४८ हजार रुपये किमतीची खैराची ३५ झाडे चोरून नेल्याची तक्रार मंडणगड पोलिसात शनिवारी (ता. २) नोंदविली आहे.

जमीन मालक सुधीर सीताराम सोंडकर (५१, व्यवसाय शेती, रा. कादवण देऊलवाडी) यांनी मंडणगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी ३१ जुलै रोजी सायंकाळी ४.३० ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्यादरम्यान कादवाण देऊलवाडी येथील सामाईक मालकीच्या जमिनीत घुसून १५० खैराच्या झाडापैकी ३५ सौराची मोठी झाडे तोडून नेली. त्या झाडांची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे ४८ हजार रुपये इतकी आहे. तक्रारीनंतर मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 04/Aug/2025